चाळीसगाव बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंत्याच्या घरात सापडले इतक्या लाखांचे सोने

क्लस्टर कामाचे बिल काढण्यासाठी स्वीकारली होती चार लाखांची लाच


Gold worth so many lakhs was found in the house of a bribe-taking engineer of Chalisgaon construction department चाळीसगाव : क्लस्टर विकसीत करण्याच्या कामाचे चार कोटी 82 लाखांचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती चार लाखांची लाच घेताना चाळीसगाव बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (अशोक नगर, धुळे) यांना नाशिक एसीबीने नाशिकमधील गडकरी चौकात शनिवारी सायंकाळी पकडले होते. विसपुते यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, विसपुते यांच्या धुळ्यातील निवासस्थानातून एसीबीने तब्बल 27 तोळे सोने जप्त केले आहे. याचे बाजारमूल्य सुमारे 15 लाखाहून अधिक आहे.

नाशिकमध्ये झाला सापळा यशस्वी
नाशिकच्या तक्रारदाराने डॉ.शामा प्रसाद मुखर्जी रुरबन या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा, ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसीत करण्याचे काम घेतले होते. या कामाची चार कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाच्या अतिरीक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात आरोपी विसपुते यांनी पाच लाखांची लाच मागितली मात्र चार लाखात तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारदार हे नाशिकमध्ये आल्यानंतर सार्वजनिक रस्ता गडकरी चौकात शनिवारी सायंकाळी लाच स्वीकारताच विसपुते यांना अटक करण्यात आली.







धुळ्यातील घरातून 27 तोळे सोने जप्त
नाशिकमध्ये विसपुते यांना अटक केल्यानंतर एसीबीने धुळ्यातील अशोक नगरातील निवासस्थानाची झडती घेतली असता तब्बल 27 तोळे सोने आढळून आल्याची माहिती एसीबीने दिली आहे तसेच काही बँकांचे पासबुकही जप्त करण्यात आले आहे. विसपुते यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 20 पर्यंत पोलीस कोठडीभ सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे अधिकारी करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !