बोरखेडा हत्याकांड : भुसावळात नोडल अधिकार्यांची व्हिसीद्वारे नोंदवली साक्ष
Borkheda Massacre: Testimony of Nodal Officers in Bhusawal recorded by VC भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारातील हत्याकांड प्रकरणी भुसावळ सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी दोन नोडल ऑफिसरची व्हिडीओ कॉन्फन्सींगव्दार साक्ष नोंदविण्यात आली तसेच अंगझडती पंच व मुख्य साक्षीदार अशा चार साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. या खटल्यात आतापर्यंत 19 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली आहे.
अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीसह चौघांची हत्या
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून चौघा भावंडाची हत्या करण्यात आल्याची घटना रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात 15 ऑक्टोबर 2020 रोजी घडली असून या हत्याकांडातील आरोपी अद्यापही कारागृहात आहे. भुसावळ सत्र न्यायालयाने या खटल्याची सुनावणी सुरू आहे. बोरखेडा शिवारातील शेतात 15 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री दोन मुले, दोन मुली अशांची हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला व त्याचवेळी अन्य भावंडांना जाग आल्याने त्यांचीदेखील हत्या करण्यात आली.








