कापसीत अनैतिक संबंधातून तरुणाचा खून : तिघे जाळ्यात
नागपूर : अनैतिक संबंधात अडसर येत असलेल्या पतीचाच त्याच्या ढाबे चालक असलेल्या एकाने दोघांच्या मदतीने खून केल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती मात्र गुन्हे शाखेने शिताफीने या गुन्ह्याचा उलगडा केला. पंकज दिलीप गिरमकर (32, रा. समतानगर, वर्धा) याच्या खून प्रकरणी संशयीत आरोपी अमरसिंह उर्फ लल्लू जोगेंद्रसिंह ठाकूर (24, कापसी), मनोज उर्फ मुन्ना रामप्रवेश तिवारी (37, रा.बक्सर, बिहार) आणि शुभम उर्फ तुषार राकेश डोंगरे (28, इमामवाडा) अशी अटकेतील आरोपींची नावे असून अन्य एक साथीदार तथा बालाघाट येथील रहिवासी बाबाभाई पसार आहे.
अनैतिक संबंधातून केला खून
वर्धा रहिवासी पंकज गिरमकर कापसी परीसरात राहत असताना त्याची अमर सिंह सोबत ओळख वाढली व त्याचा फायदा घेऊन आरोपी अमर पंकजच्या पत्नीच्या संपर्कात आला व त्यांचे सूत जुळले. अमरला समजविण्यासाठी 28 डिसेंबरला पंकज धाब्यावर आल्यानंतर दोघांमध्ये या कारणावरून वादही झाले. आरोपी अमरने शुभम डोंगरे, कुक मुन्ना तिवारी आणि वेटर बाबाभाई यांना सोबत घेत पंकजच्या डोक्यावर भारदार वस्तूने प्रहार करीत त्याचा खून केला व मृतदेह खड्डा खोदून त्याच्यासह बाईकदेखील पुरली. गोपनीय माहितीवरून गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले.



