चार हजारांची लाच भोवली : व्यवसाय कर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


4,000 bribe : Business tax officer in ACB’s net नाशिक : व्यवसाय कर रद्द करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना नाशिकमधील व्यवसाय कर अधिकारी स्नेहल सुनील ठाकुर (52) यांना एसीबीने लाच स्वीकारताच बेड्या ठोकल्या.

असे आहे लाच प्रकरण
नाशिकमधील तक्रारदार यांचे कल्पदीप इंडस्ट्रियल सिक्युरीटी सर्विसेस ही कंपनी दोन वर्षापासून बंद असल्याने तिचा व्यवसायकर रद्द व्हावा यासाठी दि बुधवार, 13 सप्टेंबर 23 रोजी व्यवसाय कर अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करण्यात आला. व्यवसाय कर रद्द करून देण्याच्या बदल्यात यातील लोकसेविका स्नेहल ठाकूर यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार लाच मागितली व चार हजारात तडजोड झाली. तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवताच सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारताच ठाकूर यांना अटक करण्यात आली.







यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विश्वजीत पांडुरंग जाधव, प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे, शीतल सूर्यवंशी, चालक संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !