वराडच्या तरुणाला किरकोळ वादातून चाकू मारला : सहा जणांविरोधात गुन्हा


Warad youth stabbed to death over petty dispute : Crime against six धरणगाव : किरकोळ वादातून धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावात तरुणाला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली तसेच चाकूने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी बुधवारी रात्री 9 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून मारला चाकू
टिकाराम रामचंद्र पाटील (38, वराड बुद्रुक, ता.धरणगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. एक वर्षांपूर्वीच्या जुन्या वादातून गावातील तुषार भगवान पाटील यांच्यासह इतरांनी गुरुवार, 14 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता टिकाराम पाटील याला अश्लील शिवीगाळ व मारहाण केली. तुषार पाटील याने टिकाराम यांना चाकूचे वार करीत गंभीर जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या टिकाराम पाटील यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.







उपचार घेतल्यानंतर टिकाराम पाटील यांनी बुधवार, 20 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी तुषार भगवान पाटील, भिकन लक्ष्मण पाटील, बादल मधुकर पाटील, पंडीत किसन पाटील, भटू भासकर पाटील, रितेश ज्ञानेश्वर पाटील (सर्व रा.वराड बुद्रुक, ता.धरणगाव) यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !