महाराष्ट्र माळी समाज महासंघ महिला जिल्हाध्यक्षपदी संध्या माळी
यावल : महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदावर तालुक्यातील साकळी येथील रहिवासी संध्या गणेश माळी यांची निवड करण्यात आली. रविवार, 2 रोजी महासंघाची जिल्हा बैठक जळगाव सहकारी शिक्षण प्रशिक्षण हॉलमध्ये प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी माळी यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आणि त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर ज्ञानेश्वर महाजन (धरणगाव), डॉ.नलीन महाजन, जिल्हा परीषद सदस्य नाना महाजन, मावळते जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्षा रेखा महाजन (नाशिक), प्रदेश सचिव भास्कर पाटील, मावळत्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा महाजन उपस्थित होत्या. संध्या माळी या महिला उद्योजक त्या जळगाव येथील प्रसिद्ध संध्या किड्स अँड कॅटलच्या संचालिका असून त्यांना समाज कल्याण विभाग अंतर्गत उत्कृष्ट महिला उद्योजिका म्हणून सन्मानीत करण्यात आलेले आहे.



