संतापजनक : रीक्षात विवाहितेवर सामूहिक अत्याचार
Outrageous : Gang rape of married couple in rickshaw डोंबिवली : राज्यातील महिलांसह मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. मित्राच्या घरी ठेवलेले साहित्य घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचार करण्यात आला व पीडीतेने सुटका केल्यानंतर पुन्हा नराधमांनी रीक्षात महिलेला कोंबत पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. नागरीकांनी मात्र या घटनेला विरोध करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.
असे आहे नेमके प्रकरण
डोंबिवली पूर्वेतील कुंभारखान परिसरात पिडीत महिला राहते. डोंबिवलीतील एका भागात पीडित दाम्पत्य वास्तव्यास होते मात्र घर सोडावयाचे असल्याने त्यांनी आपले घरगुती सामान त्यांच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवल्याने रविवार, 17 सप्टेंबरच्या संध्याकाळी पिडीत महिला आणि तिचा पती हे त्यांचे सामान आणण्यासाठी गेले असता आरोपींनी महिलेच्या पतीला दारू आणण्यासाठी पाठवताच महिला घरी एकटी असताना तिच्यावर घरी असलेल्या दिनेश गडारी याने अत्याचार केला. यावेळी सुनील राठोडही उपस्थित होता व पीडीता घराबाहेर निघाल्यानंतर पळू लागताच तिचा पाठलाग करुन दिनेश गडारी याचा मित्र सुनील राठोड याने तिला एका रीक्षात कोंबत तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला मदतीची याचना करत होती. डोंबिवलीतील नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली.








