जळगावात मंदिरात मूर्तींसह पादुका लांबवणार्‍या संशयीताला बेड्या


जळगाव : शहरातील प्रेमनगरातील श्री सप्तश्रृंगी मंदीरातून देवीच्या मूर्तीसह पितळी पादुका लांबवणार्‍या चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी गुरुवारी सराफ बाजारात बेड्या ठोकल्या आहेत. चोरीचा प्रकार 15 सप्टेंबर रोजी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तुषार रामचंद्र भारंबे (38, शिवकॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे चोरी प्रकरण
जळगाव शहरातील प्रेमनगरात श्री सप्तश्रृंगी देवीचे मंदीर आहे. या मंदीरातील पंचधातूची देवीची मूर्ती व पादुका 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास चोरीला गेल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.







सराफ बाजारातून आवळल्या मुसक्या
गुन्ह्यातील संशयित आरोपी हा सराफ बाजार परीसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पथकाने संशयित आरोपी तुषार रामचंद्र भारंबे (38, शिवकॉलनी, जळगाव) याला सराफ बाजारातून अटक केली. आरोपीकडून चोरी केलेली देवीची मूर्ती आणि पादुका हस्तगत करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !