अमळनेरात अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती : तरुणाविरोधात गुन्हा
Underage girl pregnant due to rape in Amalnerat : Crime against youth अमळनेर : शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीवर भावाला ठार मारण्याच्या भीतीने अत्याचार करण्यात आला. वारंवार झालेल्या अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडीतेने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर संशयित विशाल बाबूराव कोळी (20) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठार मारण्याची धमकी देत अत्याचार
शहरातील एका भागातील पीडीतेवर संशयित विशाल कोळी याने 13 जुलै ते 17 सप्टेंबरदरम्यान वेळोवेळी अत्याचार केला तसेच पीडीतेच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडीतेने अत्याचाराची वाच्यता केली नाही मात्र अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडीतेने तरुणाविरोधात तक्रार नोंदवली. तपास उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहेत.


