जळगावातील कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध
Notorious criminals in Jalgaon nabbed जळगाव : जळगाव पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगाराला नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. पोलिस दलाच्या पटलावरील गुन्हेगार आझाद बहादूर भाट याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आझाद बहादुर भाट (41, कंजर, रा.रामदेवबाबा मंदिराजवळ, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे.
बेकायदा कारवायांना आळा न बसल्याने कारवाई
संशयीत आझाद बहादूर भाट याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत. तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया देखील झाल्या आहेत. एका गुन्ह्यात त्याच्याकडून दोन वर्ष मुदतीचा पंचवीस हजार रुपयांचा जात मुचलका घेण्यात आला होता. तरीदेखील त्याच्या बेकायदा कारवायांना आळा न बसल्याने एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयापाल हिरे यांनी गुन्हेगार आझाद भाट याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे सादर केला होता.






स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनूस शेख, हेड कॉन्स्टेबल सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील आदींनी सहकार्याने छाननीनंतर जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर स्थानबद्धतेचे आदेश पारीत करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, पोलीस नाईक इमरान सैय्यद, सुधीर सावळे, विशाल कोळी, राहुल रगडे, महिला कर्मचारी हसीना तडावी आदींच्या पथकाने केली. आझाद भाट याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली.


