वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या तरुणावर हल्ला ; 20 हजार रुपयेही लुटले : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना


मुक्ताईनगर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील चिखली शिवारातील ढाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय सुरू आहे वा नाही हे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला तसेच 20 हजार रुपयेदेखील लुटण्यात आल्याचा प्रकार एका ढाब्यावर बुधवारी रात्री 11.30 वाजता घडला. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रक्कम लूटत केली मारहाण
घोडसगाव, ता.मुक्ताईनगर येथील एक तरुण आपल्या मित्रासह चिखली शिवारातील एका ढाब्यावर वेश्या व्यवसाय सुरू आहे वा नाही हे पाहण्यासाठी गेल्यानंतर संशयीतांनी त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच हातातील चाकू व लोखंडी पाईपाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दुखापत केली. याशिवाय या तरुणाच्या खिशातील 20 हजार रुपये जबरीने काढून घेतले. याप्रकरणी पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !