‘तो’दरोडा नव्हेच ! पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच दिला गळफास
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे पडलेल्या दरोड्यामागे वेगळीच स्टोरी पोलिसांच्या तपासात समोर आली. पतीकडून सातत्याने शरीर संबंधासाठी त्रास होत असल्याने कंटाळून पत्नीनेच पतीची गळा आवळून हत्या केली व पोलिसांना सात लाख रुपये लूटल्याचा देखावा केल्याचे समोर आले आहे.
दरोड्यामुळे पोलिसांच्याही वाढल्या होत्या अडचणी
गुरुवार, 21 सप्टेंबर रोजी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास कोल्हार रोड, एकलहरे शिवार येथे नईम रशीद पठाण यांना गळफास देत दरोडेखोरांनी ठार मारत सात लाखांची रोकड व दागिणे लूटल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच यंत्रणेने धाव घेतली होती. श्रीरामपूर निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत जमखींना तत्काळ औषध उपचाराकरीता हलवले होते.






जवाबामुळे संशय आल्याने गुन्ह्याचा उलगडा
गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे समांतर तपास सुरू असता मयत नईम रशीद पठाण याची जखमी पत्नी हिचा जवाब नोंदवल्यानंतर घडलेला गुन्हा हा दरोडा नसून मयत नईम पठाण याची पत्नी बुशरा नईम पठाण (रा.एकलहरे) हिने केल्याचे स्पष्ट होताच मयत नईम रशीद पठाण याचा अंत्यविधी होताच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले व तिने चौकशीदरम्यान दरवेळी वेगवेगळे जवाब दिल्याने संशय बळावला व पोलिसांनी बुशरा पठाण हिला बोलते करताच घडला प्रकार समोर आला.
पती नईम रशीद पठाण हा शारीरीक संबंधासाठी टॉर्चर करीत असल्याने त्याच रागातून त्याची दुधात झोपेच्या गोळ्या टाकून व नंतर साडीने गळफास देत हत्या केल्याची कबुली महिलेने दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली.


