साहित्यामुळे दिव्यांग बांधवांना जगता येईल आत्मनिर्भर जीवन : खासदार रक्षा खडसे

रावेरात कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप


Due to literature, disabled people can live a self-reliant life: MP Raksha Khadse रावेर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी कार्य करीत आहेत. समाजात उपेक्षित घटक असलेल्या दिव्यांग बांधवांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी कार्य त्यांनी केले असून त्यांच्यामुळे दिव्यांग बांधवांना मिळालेल्या या साहित्याने आत्मनिर्भर जीवन जगता येईल, असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी रावेर येथे केले. सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यातर्फे रविवारी शहरातील व्ही.एस.नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटपाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी खासदार खडसे बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सजंय सावकारे, आमदार शिरीष चौधरी, भाजपा रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रावेर लोकसभा जिल्हा निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांना साहित्य वितरण करण्यात आले.

शासन दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी कटीबद्ध
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिव्यांग बांधवांच्या जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दिव्यांग बांधवांना कल्याणासाठी ग्रामपंचायतीपासून वरच्या पातळीपर्यंत आर्थिक तरतूद केली. सरकारी नोकरीततही आरक्षण दिले. महत्वाकांक्षी योजनेतून दिव्यांगाना साहित्य दिले. या साहित्यामुळे दिव्यांग बांधव आत्मनिर्भर होतील त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण जागृत होवून त्यांना दिव्यांगत्वावर मात करणे शक्य होईल. समाजात सन्मानाने जगता येईल. साहित्यामुळे दिव्यांग बांधवांना मोठा आधार मिळाला आहे. शासन दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार बंडू कापसे, भाजपाच ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, रंजना पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, रावेर लोकसभा संयोजक सुनील पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुलकर, शहराध्यक्ष दिलीप पाटील, भाजपा सरचिटणीस सी.एस.पाटील, महेश चौधरी, चंद्रकांत पाटील, महेश पाटील, पी.के.महाजन, हरलाल कोळी, अमोल पाटील, जुम्मा तडवी, महेंद्र पाटील, संदीप सावळे, अजय पाटील , उमेश महाजन, नितीन पाटील, दुर्गादास पाटील, शुभम पाटील, वासुदेव नरवाडे, रजनीकांत बारी, संजय बुवा, अरुण शिंदे, जितेंद्र पाटील, चेतन पाटील, विजय लोहार यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव, कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश
दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेवून रावेर खासदार रक्षा खडसे यांनी केंद्र सरकारकडे प्रयत्न केले होते. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह अंतर्गत’ खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने भारत सरकारच्या योजनेच्या माध्यमातून रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव सहाय्यभूत साहित्य वाटपाचा कार्यक्रम शहरात यशस्वीपणे पार पडला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !