काळळद्यातील दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू


जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी फाट्यानजीक दुचाकीला धडक दिल्यामुळे भानुदास गोपाल जाधव (रा.कानळदा) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार, 14 सप्टेंबर रोजी घडला. अपघातप्रकरणी धडक देणार्‍या चारचाकी चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

चारचाकी चालकाविरोधात गुन्हा
भानुदास जाधव हे 14 सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या दुचाकीने (एम.एच.19, डी.झेड.7961) ने जळगावकडून चोपड्याकडे जात असताना खेडी फाट्याच्या अलीकडे समोरुन येणार्‍या चारचाकी वाहनाने (एम.एच.39 जे.1145) धडक दिल्याने जाधव हे ठार झाले होते. अपघात प्रकरणी मयताचे भाऊ देविदास जाधव यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी धडक देणार्‍या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदारगुलाब माळी करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !