पंढरीच्या वारीचे व्यापक स्वरूप म्हणजे नर्मदा परीक्रमा : डॉ.नि.तु पाटील


Narmada Parikrama is the broad form of Pandhari’s Vari : Dr.Ni.Tu.Patil भुसावळ : पंढरीच्या वारीचे व्यापक स्वरूप म्हणजे नर्मदा परीक्रमा असल्याचे मत डॉ.नि.तु.पाटील यांनी व्यक्त केले. भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेजमध्ये श्री गुरूदेव ज्येष्ठ नागरीक मंडळाच्या साप्ताहिक सभेत सत्कार प्रसंगी बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश विसपुते, प्रा.बी.डी.चौधरी, वासुदेव ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष धनराज पाटील उपस्थित होते. यावेळी मामा पाचपांडे यांच्याहस्ते डॉ.नि.तु.पाटील यांचा सत्कार शाल, बुके, श्री गजानन विजय हा ग्रंथ देऊन करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात ज्या सभासदांचा वाढदिवस आहे त्यांना डॉ. नितु पाटील यांच्याहस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

आगामी काळात नर्मदा परिक्रमा अनुभवावर एक पुस्तक लिहिण्याचे काम नि.तु.पाटीलचे वर्गमित्र सुश्रुत जळूकर यांनी हाती घेतले असून लवकरच त्याचे प्रकाशन होणार आहे. परीचय नारायण पाटील तर सूत्रसंचालन प्रा.बी.डी.चौधरी तर आभार प्रकाश तायडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रमाकांत पाटील, एम.यू.पाटील, महादेव हरीमकर, साधना हरीमकर, निर्मला पाटील, सुनीता पाटील यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !