भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात उद्या एक दिवसीय राष्ट्रीय परीषद


भुसावळ- भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मानव्यविद्या शाखाअंतर्गत आंतर विद्याशाखीय (र्चीश्रींळवळीश्रिळपरीू) ‘माझे जीवन हाच माझा संदेश’असा अनमोल संदेश देणार्‍या महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्तचे औचित्य साधून ‘महात्मा गांधीजींच्या विचारांची समर्पकता’ या विषयावर मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयजी नाहाटा व सर्व सन्मानीय संचालक हे उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटनप्रसंगी ‘आजके संदर्भमे गांधी चिंतनकी उपादेयता’ याविषयावर प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध गांधी विचारवंत प्राचार्य डॉ.विश्वास पाटील (शहादा) यांचे बिजभाषण होणार आहे. या परीषदेत संपूर्ण देशभरातून संशोधक अभ्यासकांचे 250 शोधनिबंध हे चार खंडांमध्ये प्रकाशित केले जाणार आहेत. या परीषदेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परीक्षेत्रातील संबंधित सर्व प्राध्यापकांनी तसेच इतर अन्यक्षेत्रातील विचारवंत, संशोधक, अभ्यासकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे व परिषदेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी आवाहन केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !