भुसावळकरांसाठी खुषखबर ! ; मॉन्जिनीज केक ब्रॅण्ड शाखेचे उद्या शहरात उद्घाटन
Good news for Bhusawalkar! ; Mongene’s cake brand branch to be inaugurated tomorrow in the city भुसावळ : खवैय्यांच्या पहिल्या पसंतीचे नाव असलेल्या मॉन्जिनीज केक ब्रॅण्ड शाखेचे बुधवार, 27 रोजी भुसावळ शहरात मोठ्या थाटात उद्घाटन होत आहे. यावल रोडवरील काशीनाथ लॉजसमोरील गाळा क्रमांक आठमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता होणार्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुलभा सुधाकर पाटील या उपस्थित राहणार आहेत. या शिवाय गलाधर फूडसचे संचालक निलेश गलाधर व डॉ.बालाजी गलाधर अतिथी असणार आहेत.
‘गो अहेड अॅण्ड सेलिब्रेट
मॉन्जिनीज हा भारतातील मोठा केक ब्रॅण्ड आहे. दिवसाला 40,000 पेस्ट्रीज, 10,000 बर्थडे केक आणि 3 लाख मफीन्स मॉन्जिनीजमध्ये विकले जातात. राष्ट्रीय पातळीवर किंवा भारतातल्या कानाकोपर्यात मॉन्जिनीज पोहोचत असताना भुसावळकरांना आता मॉन्जिनीजचे चविष्ट केक आता वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. तरुणाईसह मध्यमवयीन मंडळी आणि उच्चभ्रू वर्गाला मॉन्जिनीजने भूरळ घातली आहे.
दरम्यान, भुसावळात मॉन्जिनीज केक ब्रॅण्ड शाखेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थिती देण्याचे आवाहन रवींद्र पाटील, निलीमा पाटील, शिवाजी साठे, ज्योती साठे, डॉ.योगेश पाटील, गौरव पाटील, अॅड.आदित्य पाटील, मनस्वी पाटील, अॅड.तुषार पाटील आदींनी केले आहे .
