टहाकळीच्या नवविवाहितेचा प्रसुतीदरम्यान मृत्यू
धरणगाव : धरणगाव तालुक्यातील टहाकळी येथील नवविवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. हृदयद्रावक म्हणजे आईच्या मृत्यूनंतर बाळाचीही प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
टहाकळी येथील मनोहर पाटील यांचा खेडी येथील वंदना पाटील यांच्याशी मागील वर्षी विवाह झाला होता. विवाहानंतर महिला गर्भवती राहिल्या तर खोळ भरणीच्या कार्यक्रम झाल्यानंतर दुसर्याच दिवशी विवाहिता वंदना पाटील यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सिझर होऊन त्यांनी बाळाला जन्म दिला.



बाळाचे जन्मानंतर वजन कमी भरले होते तर दुसरीकडे वंदना पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दुसर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वंदना पाटील यांचा मृत्यू झाला. अशातच बालकाला ही त्रास होऊ लागल्याने व त्याचे वजन कमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

