तलवारीच्या धाकावर दहशत : संशयित पोलिसांच्या जाळ्यात
Terror at the point of sword : Suspects in police net जळगाव : तलवार बाळगून दहशत पसरविणार्या संशयिताला जळगाव शहर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्यांच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक प्रकाश भोसले (27, गेंदालाल मिल, जळगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी लागलीच कारवाई
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परीसरात संशयीत आरोपी दीपक भोसले हा बेकायदेशीरीत्या हातात लोखंडी तलवार घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.




