जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आज भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर


Jalgaon Collector Ayush Prasad on tour of Bhusawal Division today भुसावळ : जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे बुधवार, 27 रोजी भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर येत आहेत. सकाळी नऊ वाजता खासदार रक्षा खडसे यांच्यासमवेत ते केळी प्रकल्पाला भेट देतील तसेच सालबर्डी, ता.मुक्ताईनगर येथे पाहणी करतील तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पाणलोट बाधीत क्षेत्रातील ग्रामस्थांची ते बैठक घेणार आहेत.

भुसावळात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार आढावा बैठक
बुधवारी दुपारी तीन वाजता भुसावळ तहसील कार्यालयात विविध प्रशासकिय कामांबाबत ते आढावा बैठक घेतील. दुपारी साडेचार वाजता नगरपालिकेत भेट देवून विकासकामांचा आढावा घेतील तसेच बैठकही घेतील व साडेपाच वाजता भुसावळ पालिकेतर्फे सुरू असलेल्या श्रमदानात ते सहभाग घेतील. सायंकाळी सहा वाजता भुसावळ उपविभागीय कार्यालयात भेट देवून प्रशासकिय कामांचा ते आढावा घेणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या दौर्‍यामुळे पालिका, तहसील व प्रांताधिकारी कार्यालयातील यंत्रणा झपाटून कामाला लागली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !