श्री विसर्जन मिरवणुकीत नाचतानाच आला तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका ; कानळद्यात शोककळा


While dancing in Shri Visarjan’s procession, the young man suffered a severe heart attack; Mourning in the ears जळगाव : श्री विसर्जन मिरवणुकीत नाचणार्‍या तरुणाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव तालुक्यातील कानळदा येथे घडली. जितेंद्र ज्ञानेश्वर बाविस्कर (28, रा. काळनदा) असे मयत तरुणाचे नाव असून ही घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तरुणाला अचानक आले चक्कर
जळगाव तालुक्यातील कानळदा येथे सोमवारी गणरायाचे विसर्जनाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गावातील जितेंद्र बाविस्कर हा तरुण सहभागी झाला. मिरवणुकीमध्ये नाचत असतांना सायंकाळच्या सुमारास जितेंद्रला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला. गावातील तरुणांनी लागलीच वाहनातून जितेंद्रला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार विलास शिंदे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !