जळगावात एसीबीची मोठी कारवाई : एक लाखांची लाच मागणार्‍या वीज कंपनीच्या अभियंत्यांविरोधात गुन्हा


Big action of ACB in Jalgaon : Crime against the engineers of the power company who demanded a bribe of one lakh जळगाव : महावितरण कंपनीच्या नगरदेवळा, ता.पाचोरा येथील उपविभागीय कार्यालयाचे बांधकामाचे बिल काढण्यासाठी दहा टक्क्यांप्रमाणे एक लाखांची लाच मागणी केल्यानंतर सुरूवातीला 60 हजार रुपये स्वीकारून नंतर 40 हजारांची लाच मागणार्‍या जळगाव महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता भालेराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. विशेष म्हणजे, भालेराव यांनी कार्यकारी अभियंता (स्थापत्य) अनिरुद्ध नाईकवाडे यांच्यासाठीदेखील 20 हजारांची लाच मागण्यात आल्याने त्यांच्यादेखील अडचणी वाढल्या आहेत. तक्रारदाराने याप्रकरणात तक्रार देण्यास नकार दिल्यानंतर एसीबीनेच तक्रार नोंदवली आहे.

असे आहे लाच प्रकरण
जळगावातील 42 वर्षीय तक्रारदार हे गव्ह.कंत्राटदार आहे. त्यांनी नगररदेवळा सबडिव्हिजन कार्यालयाचे 9 लाख 65 हजार 371 रुपयांचे काम केले होते. त्यात कंपाउन्ड वॉल बांधणे, बोरींग आदी कामांचा समावेश होता. या कामाची पाहणी नाईकवाडे यांनी केल्यानंतर तक्रारदाराला नोटीस बजावत काम बरोबर नसल्याचे मत नोंदवल्यानंतर तक्रारदाराने त्यांची भेट घेतल्यानंतर हे काम सुरळीत सुरू राहू देण्याच्या मोबदल्यात 10 टक्के प्रमाणे एक लाख रुपयांची मागणी केल्याने त्यांना 60 हजार देण्यात आले तर उर्वरीत 40 हजारांसाठी नाईकवाडे यांनी तगादा लावल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवून लाच पडताळणी करण्यात आली.

संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
तक्रारीनंतर 2, 6 व 12 रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली तर लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार जळगावातील कार्यालयात गेल्यानंतर नाईकवाडे कार्यालयात नसल्याने सहाय्यक अभियंता भालेराव यांची भेट घेण्यात आली असता भालेराव यांनी नाईकवाडे यांच्यासह स्वतःसह प्रत्येकी 20 हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले मात्र लाच स्वीकारण्यात आली नाही तर तक्रारदाराने याप्रकरणात तक्रार देण्यास नकार दिल्यानंतर एसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी याप्रकरणात तक्रार नोंदवली. लाच प्रकरणात दोन्ही अधिकार्‍यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचा एसीबीने शोध सुरू केला आहे. तपास पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !