जळगाव जिल्हावासीयांसाठी खुषखबर ; वाघूर धरणे भरले


Good news for Jalgaon district residents ; Waghur Dam is full जळगाव : वाघूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरण 100 टक्के भरल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे दोन दरवाजे 10 से.मी. ने उघडण्यात आले असून त्याद्वारे 677 क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला.

नदीकाठावर सतर्कतेचा इशारा
धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठावरील नागरीकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रामध्ये कुणीही प्रवेश करू नये, शेतीसाठी उपयुक्त सामान ठेवू नये किंवा गुरेढोरे सोडू नये, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व जिल्हा प्रशासनाने केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !