एक दिवसांपूर्वीच एटीएम लुटण्याचा डाव फसला मात्र दुसर्याच दिवशी एसबीआय एटीएम फोडत 19 लाख लांबवले ; पिंपळगावात खळबळ
A day ago, the attempt to rob the ATM failed, but the next day, SBI broke the ATM and made away with 19 lakhs; A lot of excitement in Pimpalgaon पिंपळगाव बसवंत : एक दिवसांपूर्वीच एटीएम लुटण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यांनी पुन्हा पोलिसांना आव्हान देत तेच एटीएम फोडत सुमारे 19 लाखांची रोकड लांबवल्याचा प्रकार पिंपळगाव बसवंत येथे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली.
चोरट्यांची पोलिसांना कडक सलामी
मंगळवारी भरवस्तीत असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला. यावेळी एटीएमचे सायरन व सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी नादुरुस्त केल्यानंतर बँक प्रशासनाने ते दुरूस्त केले नसल्याची संधी चोरट्यांनी पुन्हा साधली. एटीएमला लक्ष करत त्यातून जवळपास 19 लाख सहा हजार 500 रुपये लांबवण्यात आले.

दरम्यान, एक महिन्यापूर्वी चिंचखेड चौफुलीवर असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी 28 लाख रुपये लांबवल्याची घटना ताजी असताना पुन्हा एटीएम फोडण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

