अभोडा धरणाच्या पाटचारीजवळ मेंढपाळाला लूटले


A shepherd was robbed near Patchari of Abhoda dam रावेर :  अभोडा धरणाच्या पाटचारीजवळ मेंढपाळाला अडवून लुटण्यात आल्याची धक्कदायक घटना रविवार, 24 रोजी सकाळी 11 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात चौघांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात लुटारूंचा पोलिसांकडून कसून शोध
चंदन रामा धनगर (50, मुंजलवाडी, ता.रावेर) हे व्यवसायाने मेंढपाळ असून रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ते अभोडा धरणाजवळून जात असताना अज्ञात चौघांनी त्यांचा रस्ता अडवत त्यांना मारहाण केली व त्यांच्या बनियनच्या बंडीत ठेवलेले आठ हजार तीनशे रुपये हिसकावून पळ काढला. मारहाणीत धनगर हे जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर धनगर यांनी रावेर पोलिसात सोमवारी तक्रार दिल्यानंतर अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !