भुसावळात श्री विसर्जनाला आलेल्या भाविकाची ओमनी पेटली : एक जण किरकोळ जखमी


Omni of a devotee who came to Sri Visarjana caught fire in Bhusawal : One person was slightly injured भुसावळ : शहरात गणरायाला भाविकांकडून भक्तीभावाने निरोप दिला जात असताना विसर्जनासाठी आलेल्या एका भाविकाची ओमनी अचानक पेटल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याघटनेने गाडी चालक किरकोळ जखमी झाले. सुदैवाने वाहनात कुणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली तर पाण्याचा मारा केल्यानंतर काही वेळेत आग विझवण्यात आली.

गाडी चालक किरकोळ जखमी
भुसावळ शहरातील तापी नदीच्या पात्रात गुरुवारी सकाळपासूनच गणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी वाढली असता जुना सातारा भागातील गोपाळ भंगाळे हे आपल्या कुटुंबासह भगवान परशुराम मंदिराच्या बाजूने गणेश विसर्जनासाठी ओमनी कारमधून आले होते. त्यांनी नदीपात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन केले. यानंतर बाहेर उभ्या असलेल्या ओमनीला सेल देताच या गाडीने पेट घेतला व काही क्षणात संपूर्ण ओमनी पेटली. या प्रकारामुळे भाविकांमध्ये काही वेळ भीती पसरली तर नागरीकांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. गॅसवर हे वाहन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाहन पेटल्यानंतर गोपाळ भंगाळे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या गाडीत कोणीही नसल्याने जीवित हानी टळली आहे. गाडीच्या काचा बंद असल्यामुळे व बाहेरून देखील ऊन असल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !