नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान चौघे भाविक बुडाले : दोघांचा मृतदेह आढळला


Four devotees drowned during Ganesh immersion in Nashik district: bodies of two found नाशिक : राज्यात मोठ्या भक्तीभावाने गणरायाला निरोप दिला जात असताना नाशिक जिल्ह्यात दोन घटनांमध्ये मात्र चार भाविक बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील गोदावरी नदीत दोन आणि इगतपुरीतील वालदेवी धरणात दोन गणेशभक्त बुडाले असून ईगपुरीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह मिळाले आहेत.

दोघा भाविकांचा पथकाकडून शोध
नाशिक शहरातील गोदावरी नदीवरील घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या ठिकाणी रामकुंड परिसरातील गाडगे महाराज पुलाजवळील घाटावर दोन गणेश भक्त बुडाले. हे गणेश भक्त विसर्जनासाठी आले होते. याचवेळी ते दोघेही बुडाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत या दोघांचाही बचाव पथकाकडून शोध घेतला जात आहे.

ईगतपुरीत दोघांचा मृत्यू
इगतपुरी तालुक्यातील वालदेवी धरणात परीसरता मित्रांसोबत गेलेल्या दोन युवकांचा धरणात बुडून मृत्यू झाला. या दोघांचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले. मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !