भुसावळात मॉन्जिनीज केक ब्रॅण्ड शाखेचे थाटात उद्घाटन
मॉन्जिनीजचे चविष्ट केक आता वाजवी दरात ; एकवेळ भेट देवून खात्री करा
Grand opening of Mongene’s Cake brand branch in Bhusawal भुसावळ : खवैय्यांच्या पहिल्या पसंतीचे नाव असलेल्या मॉन्जिनीज केक ब्रॅण्ड शाखेचे बुधवार, 27 रोजी भुसावळ शहरात मोठ्या थाटात उद्घाटन झाले. यावल रोडवरील काशीनाथ लॉजसमोरील गाळा क्रमांक आठमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता द केक फेअरीच्या संचालिका सुलभा सुधाकर पाटील यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी आवर्जून उपस्थितीत देत मॉन्जिनीज केक ब्रॅण्ड शाखेच्या उद्घाटनाबद्दल शुभेच्छा दिल्या.
‘गो अहेड अॅण्ड सेलिब्रेट
मॉन्जिनीज हा भारतातील मोठा केक ब्रॅण्ड आहे. दिवसाला 40,000 पेस्ट्रीज, 10,000 बर्थडे केक आणि तीन लाख मफीन्स मॉन्जिनीजमध्ये विकले जातात. राष्ट्रीय पातळीवर किंवा भारतातल्या कानाकोपर्यात मॉन्जिनीज पोहोचत असताना भुसावळकरांना आता मॉन्जिनीजचे चविष्ट केक आता वाजवी दरात उपलब्ध झाले आहेत. तरुणाईसह मध्यमवयीन मंडळी आणि उच्चभ्रू वर्गाला मॉन्जिनीजने अक्षरशः भूरळ घातली आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
दरम्यान, भुसावळात मॉन्जिनीज केक ब्रॅण्ड शाखेच्या उद्घाटनप्रसंगी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, माजी नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, रवी ढगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित देत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रवींद्र पाटील, निलीमा पाटील, शिवाजी साठे, ज्योती साठे, डॉ.योगेश पाटील, गौरव पाटील, अॅड.आदित्य पाटील, मनस्वी पाटील, अॅड.तुषार पाटील आदींची उपस्थिती होती.
मॉन्जिनीजमध्ये भेट देण्यासाठी येथे साधा संपर्क
द केक फेअरी
यावल रोडवरील काशीनाथ लॉजसमोरील गाळा क्रमांक आठ
भुसावळ, जि.जळगाव मो.9767268629

