चितोडा गावातील तरुणाची आत्महत्या : पाच जणांविरुद्ध गुन्हा


Suicide of youth in Chitoda village : Crime against five persons यावल : यावल तालुक्यातील चितोडा येथील 23 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केल्यानंतर तू गाव सोडून निघून जा, असे हिणवत दम दिल्याने त्रासाला कंटाळून तरुणाने शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चितोडा येथील पाच जणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रासाला कंटाळून तरुणाने उचलले पाऊल
चितोडा, ता.यावल येथील रहिवासी संतोष बाबुराव किनगे या इसमाने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा दुर्गेश संतोष किनगे (23) याला रजनी भास्कर जंगले, भास्कर आनंदा जंगले, रेखा भूषण जंगले, भूषण भास्कर जंगले व ज्ञानेश्वर भास्कर जंगले (सर्व राहणार चितोडा, ता.यावल) या पाच जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली व तू गाव सोडून निघून जा, तू जर गेला नाही तर आम्ही तुला सोडणार नाही, असे सांगून त्याला दम दिला. संशयित सातत्याने त्रास देत असल्याने या जाचाला कंटाळून दुर्गेश किनगे याने देविदास तुकाराम पाटील (रा.चितोडा) यांच्या शेत गट क्रमांक 557 मधील शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी संतोष किनगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चितोडा गावातील पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !