दहिवद खुर्दच्या तरुणाचा खून : न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा


Murder of Dahiwad Khurd’s youth : Court-ordered offence अमळनेर : अमळनेर तालुक्यातील दहिवद खुर्द गावातील तरुणाची मारहाण करीत हत्या करून मृतदेह नाल्याकाठी फेकल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून संशयीताविरोधात अमळनेरात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण पांडुरंग पाटील (32, दहिवद खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर संशयित अशोक उर्फ रिंकू प्रकाश पाटील याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्या आला.

असे आहे खून प्रकरण
लोणे-भोणे फाट्याजवळ 22 एप्रिल रोजी प्रवीण पाटील हा नाल्याच्या काठी मयत अवस्थेत आढळून आला होता. अशोक उर्फ रिंकू प्रकाश पाटील या संशयितानेच खून केल्याचा संशय असल्याने न्यायालयात धाव घेवून फिर्याद दाखल करण्यात आली. न्यायालयाने चौकशीत करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील भांडणाच्या वादातून हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयीन आदेशाने दाखल खूनाच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करत आहेत.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !