विहिरीत पोहताना बुडाल्याने तरुणाचा मृत्यू


Youth dies after drowning while swimming in a well जळगाव :  विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 30 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पवन भिका जाधव (23, रा.सुभाषवाडी, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

अशी घडली घटना
पवन भिका जाधव हा परीवारासह सुभाषवाडी येथे वास्तव्यास होता व मिस्त्री काम करून तो उदरनिर्वाह करीत होता. शनिवार, 30 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता तो मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडल्ला व गावातील एका विहिरीजवळ पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. ग्रामस्थांना घटना कळताच त्यांनी पट्टीच्या पोहणार्‍यांना बोलावले. त्यांनी तरुणाचा मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला असता तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मयत घोषित केले.



एमआयडीसी पोलिसात नोंद
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पवन जाधवच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, दोन विवाहित बहिण असा परीवार आहे. तरुणाच्या मृत्यूने सुभाषवाडी गावात शोककळा पसरली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !