जामन्या वनक्षेत्रातील सात हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण भुईसपाट

रावेर : यावल अभयाण्यातील जामन्या वनक्षेत्रात अनधिकृतपणे वनविभागाच्या सुमारे सात हेक्टर जमिनीवर अवैध पध्दतीने केलेले अतिक्रमण जामन्या वन्यजीवचे वनपाल अक्षय म्हेत्रे यांच्या पथकाने काढले. यावल अभरण्यातील जामन्या वनक्षेत्रातील कक्ष क्र.20 मध्ये सुमारे सात हेक्टर जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने 10 रोजी वनपाल म्हेत्रे यांच्या पथकाने अतिक्रमण हटवत अभयारण्य मोकळले केले. कारवाई करणार्या पथकात वनपाल ललित सोनार, चौधरी, जाधव, वनपाल अयूब तडवी, वनरक्षक हुकार्या बारेला, सतीश वाघमारे, सेमी बारेला, सोनाली बारेला, के.बी.पवार, राजू तडवी, राजू बोंडाल, राजमल बारेला, सविता बारेला, सफीना तडवी, नवल जाधव यांच्या सह वनकर्मचारी यावल अभयारण्यातील कर्मचारी, मजूर सहभागी झाले. एसआरपी गट क्र.6 चे एस एएसआय के.एस.परदेशी यांनी सहकार्य केले.




