किरकोळ वाद उफाळला : महिलेसह मुलाला मारहाण


A minor dispute broke out : woman and child were beaten up जळगाव : किरकोळ वादातून महिलेसह मुलाला मारहाण झाल्याची घटना पिंप्राळा परीसरातील कुंभारवाड्यात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
जळगाव शहरातील पिंप्राळ्यातील कुंभारवाड्यात छाया पितांबर बैरागी वास्तव्याला आहेत. शनिवार, 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांच्या घराच्या अंगणात असलेल्या गटारीचे बांधकाम झाल्याने त्या स्लॅबचे काम करीत असताना संशयित अरुण कोळी, जितेंद्र कोळी व त्याचा लहान भाऊ (तिघे रा.कोळीवाडा) यांच्यासह दोन जण तिथे आले. त्यांनी महिलेला तू येथे स्लॅब का टाकत आहे, असे म्हणत या जागेचे पैसे मला दे असे म्हणाले. त्यावर महिलेने कोर्टात केस सुरू असून कोर्टाचा जो निर्णय येईल त्यानंतर पाहू असे सांगितले.



दरम्यान, जितेंद्र कोळी याने महिलेला शिवीगाळ करीत त्याच्या हातातील टिकावचा दांडा डोक्यात व हाता-पायावर मारुन गंभीर जखमी केले. याचवेळी महिलेला मुलगा यश हा आवरण्यासाठी आला असता, त्यालादेखील मारहाण करीत गंभीर जखमी केले. हे भांडण परीसरातील नागरिकांनी सोडावित जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !