कजगाव सशस्त्र दरोड्याने हादरले : पावणेचार लाखांचा ऐवज लूटला
Kajgaon rocked by armed robbery : Rs 54 lakh looted कजगाव, ता.भडगाव : सात ते आठ दरोडेखोरांनी गावात दोन ठिकाणी दरोडा टाकल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, भडगाव पोलिसात याप्रकरणी पावणेचार लाखांचा ऐवज लुटल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन घरांवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सदस्यांना मारहाण करीत सोने -चांदीसह अंदाजे लाखोंचा ऐवज लूटल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला.
मारहाण करीत केली लूट
गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरांवर दरोडा पडल्याचे सांगण्यात आले. दरोडेखोरांनी चव्हाण व देशमुख कुटूंबास मारहाण करीत सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली. घटनास्थळी पोलिस अधिकार्यांनी धाव घेतली तर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.


