इंद्रप्रस्थ संस्थेतर्फे डॉ.स्वप्नाली वाडेकर यांचा पुरस्काराने गौरव
पुणे : इंद्रप्रस्थ एज्युकेशनल रीसर्च अॅण्ड चॅरीटेबल ट्रस्टतर्फे डॉ.स्वप्नाली श्रीकांत वाडेकर यांना ‘इंडियाज मोर स्पार्कलिंग अवॉर्ड’ ने नुकतेच गौरवण्यात आले. पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ.वाडेकर यांनी होमिओपॅथिक वैद्यकीय व्यवसायात तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल घेवून त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. वंध्यत्व आजाराने त्रस्त अशा बहुसंख्य जोडप्यांवर डॉ. स्वप्नाली वाडेकर यांनी होमिओपॅथिक उपचार करीत त्यांना आई बाबा होण्याचे सुख मिळवून दिल्याने त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. डॉ. स्वप्नाली वाडेकर यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांच्या आप्तेष्टांकडून, स्वकीयांकडून आणि सहकारी परीवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
