ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला : राज्यातील 2359 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

जळगाव जिल्ह्यात 167 ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूका ; 128 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका ः आचारसंहिता लागू,


Bugle of Gram Panchayat Elections : Election program of 2359 Gram Panchayats in the state has been announced जळगाव : राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच 2068 ग्रामपंचायतीमधील 2950 सदस्य पदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत. जळगाव जिल्ह्यात 167 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर 81 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत 128 रिक्त पदांसाठी निवडणूका होणार आहेत. 5 नोव्हेंबर 2023 रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

आचारसंहिता लागू
ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून मंगळवार, 3 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. या नामनिर्देशन पत्रांची छाननी 23 ऑक्टोबरला होईल. 25 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

25 ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदानाची तारीख 5 नोव्हेंबर असणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. गडचिरोली आणि गोंदिया या भागात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. तर 7 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !