चिंचोली येथील 60 वर्षीय वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू
A 60-year-old man from Chincholi fell into a well and died यावल : यावल तालुक्यातील चिंचोली येथील 60 वर्षीय वयोवृद्धाचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. हा प्रकार निदर्शनास येतात तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात वयोवृद्धाला आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पाय घसरून पडल्याने मृत्यू
चिंचोली, ता.यावल येथील रहिवासी अमृत कौतीक साळुंखे (60) असे मयत वयोवृद्धाचे नाव आहे. विहिरीत पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार निदर्शनास येताच विहिरीतून काढून त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार वासुदेव मराठे करीत आहेत


