पहूर परीसरातील तरुणीवर अत्याचार : लिव्ह अ‍ॅण्ड रीलेशनशिप’च्या नोटरीवर घेतली स्वाक्षरी

पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा ; पीडीतेच्या भावाला जीवे मारण्याचीही धमकी !


Harassment of a young woman in Pahoor area: signature taken at the notary of ‘Live and Relationship’ जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय तरुणीकडून ‘लिव्ह अ‍ॅण्ड रीरलेशनशीपच्या नोटरीवर जबरदस्ती सही घेत तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
संशयित मयूर देवद गोढरी याने 1 ते 3 सप्टेंबर तसेच 6 सप्टेंबरपासून 15 दिवस वेळोवेळी जळगाव येथील वकिलाच्या घरी आणि गावातील त्याच्या घरी तू जर माझ्या सोबत पळून जावुन लग्न कर, तू जर आली नाही तर तुझ्या भावाला मारुन टाकेन, अशी धमकी दिली. तसेच पीडीत तरुणीकडून ‘लिव्ह अ‍ॅण्ड रीलेशनशिप’चे नोटरीवर सही घेवून इच्छा नसतांना तिच्या सोबत वेळोवेळी बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी भादवि कलम 376 (2) आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !