जळगावात खळबळ : दहावीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
Excitement in Jalgaon : Class 10th student commits suicide जळगाव : जळगावातील 14 वर्षीय विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेत आत्महत्या केली. तन्मय गजेंद्र पाटील (14, रा.गणेश कॉलनी, जळगाव) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. मंगळवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना समोर आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूपूर्वी विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहिली आहे.
तणावातून केली आत्महत्या
शहरातील ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी तन्मय हा गणेश कॉलनीत आई, वडील अॅड.गजेंद्र पाटील आणि मोठा भाऊ ओम यांच्यासोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावात होता. मंगळवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपले असताना त्याने छताला गळफास घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तन्मयला नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली. अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.


याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार संतोष सोनवणे करीत आहेत.
