जिल्हा रुग्णालयात तोतया डॉक्टराला चोपले


एम.डी.असल्याची बतावणी करीत तरुणीला इंजेक्शन देण्यापूर्वीच प्रकार उघडकीस

जळगाव : जिल्हा रुग्णालयात एम.डी. डॉक्टर असल्याची बतावणी करुन वार्ड क्रमांक चारमध्ये 12 वर्षीय तरुणीची तपासणी करुन तिला इंजेक्शन देण्याच्या तयारीतील मद्यधुंद तोतया डॉक्टरला नागरीकांनी बेदम चोप दिल्याची घटना मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. मुकेश चंद्रशेखर कदम (30, रा.मोहाडी) असे तोतया डॉक्टरचे नाव आहे.

पसार होतानाच आवळल्या मुसक्या
तोतया असल्याचा भंडाफोड झाल्याचे लक्षात येतात मुकेशकदम या तरुणाने वॉर्डातून काढता पाय घेतला तर तरुणीच्या वडिलांसह परीचारीका तसेच डॉक्टरांनी तोतयाचा पाठलाग करीत मागच्या बाजूने तोतया डॉक्टर पसार होण्यापूर्वीच त्याला पकडले. जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत कार्यरत सहाय्यक फौजदार किरण पाठक व पोलीस कॉन्स्टेबल राहूल घेटे या कर्मचार्यांच्या स्वाधीन केले. यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी पाचारण करुन जमाव पांगविला. तसेच संबंधित मुकेश कदम या तोतया डॉक्टरला ताब्यात घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !