जळगावातील तरुणीकडून खंडणी उकळली ; भावी पतीला पाठवले अश्लील फोटो
Extorted from a young woman in Jalgaon ; Indecent photos sent to future husband जळगाव : शहरातील एका भागातील 24 वर्षीय तरुणीकडून 16 हजारांची खंडणी स्वीकारून तरुणीचे अश्लील अवस्थेतील फोटो तिच्या भावी पतीला पाठवून बदनामी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित प्रफुल्ल सुधाकर सोनवणे उर्फ सूर्यवंशी (जळगाव) याच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे आहे खंडणी प्रकरण
जळगाव शहरातील एका भागातील 24 वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती शिक्षण घेते. तरुणीच्या परीचीत असलेल्या संशयित प्रफुल्ल सोनवणे याने तरुणीचे अश्लील अवस्थेत फोटो काढले व पीडीतेेचे लग्न ठरल्यानंतर तिच्या भावी पतीला फेसबुकवर फ्रेंड रीक्वेस्ट पाठवून हे फोटो पाठवत तरुणीच्या चारीत्र्याची बदनामी केली तसेच पीडीतेकडून वेळोवेळी 16 हजारांची खंडणीही उकळली. याप्रकरणी तरुणीने जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा करीत आहे.


