माजी नगरसेविकेवर अत्याचार ; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Ex-Corporator Abused ; The accused was handcuffed by the police पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी नगरसेविकेवरच अत्याचार करण्यात आल्याची बाब समोर आली असून याप्रकरणी याप्रकरणी पर्वती पोलिसात सचिन मच्छिंद्र काकडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला अटक करण्यात आली.
असे आहे नेमके प्रकरण
आरोपी काकडे आणि माजी नगरसेविका हे अनेक दिवसापासून एकमेकांचे मित्र होते. 2017 पासून आरोपी काकडे यांनी नगरसेविकेला धमकावून अत्याचार केल्याचा आरोप आहे. माजी नगरसेविकेकडून आरोपीने दहा लाख रुपये उकळले तसेच मैत्री संबंध बाबतची माहिती देऊन फोटो समाज माध्यमात वायरल करण्याची धमकी देखील आरोपीने दिल्याचा आरोप आहे.


