नशिराबादमधून साडेचार लाखांचे गोडे तेल लांबवले
Four and a half lakh worth of sweet oil was sent from Nashirabad
नशिराबाद : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधून चार लाख 48 हजार 420 रुपये किंमतीचे गोडे तेलाचे डबे भामट्यंनी लांबवले. ही चोरी गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी अज्ञात पाच जणांविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक व वाहक झोपताच चोरट्यांनी साधली संधी
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावानजीक असलेल्या शिवशक्ती कार बाजार आहे व या बाजाराच्या बाजूला गोडे तेलाचे डबे भरून आणलेला आयशर ट्रक (एम.एच.30 बी.डी.1349) हा रोडच्या बाजूला बुधवार, 4 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता चालक संतोष देवीदास डाबेराव (45, बल्लभनगर, अकोला) आणि क्लिनर अंकित रवी शिरसाळे यांनी पार्क केला व थकल्यामुळे ते झोपी गेले.


गुरूवार, 5 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या अज्ञात पाच चोरट्यांनी आयशरमधील चार लाख 48 हजार 420 रुपये किंमतीचे तेलाचे डबे लांबवत दुसर्या वाहनातून पोबारा केला. क्लिनर अंकित शिरसाळे याला जाग आली मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले. चालक संतोष डाबेराव यांनी नशिराबाद पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार युनूस शेख करीत आहे.
