मुलीसोबत प्रेमसंबंधाचा संशय : अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला
Suspected of having an affair with a girl: A minor boy was attacked by a crocodile
जळगाव : सहा अल्पवयीनांनी एका 15 वर्षीय मुलावर मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून मारहाण करीत कोयत्याने हल्ला केला. ही घटना के.सी.पार्क परीरसरातील एका भागात बुधवार, 4 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे हल्ला प्रकरण
जळगाव तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय मुलगा हा दहावीत शिकतो. त्याने अतिरीक्त खासगी क्लासेस लावलेले आहे. त्याच्या सोबत देखील त्याच्या ओळखीचे मुलं देखील सोबत शिकवणीसाठी जातात. क्लासमध्ये शिकत असतांना मुलीवर सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून 15 वर्षीय मुलाला गुरूवार, 4 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या खासगी क्लासमध्ये शिकत असलेल्या मुलांनी त्याला बळजबरी रीक्षात बसून जळगाव शहरातील के.सी.पार्क परीसरातील एका ठिकाणी नेवून सहा जणांनी बेदम मारहाण केली. यातील एकाने कोयत्याने वार करून त्याच्या हाताला दुखापत केली. त्यानंतर सर्व पसार झाले.


याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पिडीत मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणार्या सहा अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.
