भुसावळातील प्रौढाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू
An adult in Bhusawal died after falling from the train जळगाव : भुसावळ शहरातील 55 वर्षीय प्रौढ व्यक्तीचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना जळगाव तालुक्यातील भादली गावानजीक घडली. नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नरेश गोकुळप्रसाद परदेशी (55, रा.गोलाणी कॉम्प्लेक्स, वरणगाव रोड, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
रेल्वेतून पडल्याने मृत्यू
नरेश परदेशी हे आपल्या आई व पत्नी यांच्यासोबत भुसावळ शहरातील गोलाणी कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्याला होते. बुधवार, 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ते नागपूर येथील मुलीकडे जात असल्याचे सांगून निघाले होते. त्यानंतर ते नागपूरकडे न जाता भुसावळहून जळगावला येण्यासाठी रेल्वेने प्रवास करत असतांना त्याच्या तोल जावून धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री 8 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील भादली गावानजीक घडली.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत न पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. मयताच्या पश्चात पत्नी, आई आणि मुलगा असा परीवार आहे. याबाबत नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
