जळगावात 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या


A 23-year-old youth commits suicide in Jalgaon जळगाव : शहरातील विठ्ठलपेठ परीसरातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. लोकेश विलास अत्तरदे (23, रा. विठ्ठलपेठ) असे मयताचे नाव हआहे. ही घटना शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. लोकोश हा एका कंपनीत कामाला होता मात्र त्याने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.

भाऊ गेल्यानंतर प्रकार आला समोर
लोकेशचे वडिल विलास हे स्वयंपाकी असून ते लखनो येथे कामानिमित्त गेले आहे तर आई शेतीकाम करते. शुक्रवारी सकाळी लोकेशची आई शेतात गेली असता लोकेशने घरी एकांतात आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास या तरुणाचा 10 वर्षीय चुलत भाऊ घरात लोकेशकडे पाणी मागण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला.



दरम्यान, लोकेशचे वडिल विलास अत्तरदे हे लखनौ येथून आल्यानंतर शनिवारी मयताचे शवविच्छेदन होईल. लोकेशला एक बहीण असून तिचे लग्न झाले आहे. मुलाने घेतलेल्या धक्कादायक निर्णयान अत्तरदे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !