तीन लाखांची रोकड असलेली पिशवी लांबवली : चाळीसगावात खळबळ


A bag containing three lakhs of cash was handed over : excitement in Chalisgaon चाळीसगाव : पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी दुचाकीला लावलेली पिशवी अलगद लांबवली. या पिशवीत तीन लाखांची रोकड होती. ही घटना शनिवारी शहरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

अलगद लांबवली रोकड
चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील वयोवृद्ध राजेंद्र तान्हीराम वाणी ( 57) हे कामानिमित्त शनिवारी चाळीसगावात आले होते. त्यांनी आपल्या दुचाकीच्या मागील बाजूला पिशवीत तीन लाख रुपये ठेवले मात्र चोरट्यांनी ही पिशवी पाळत ठेवून लांबवली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !