जळगावात जुन्या वादातून प्राणघातक हल्ला : पसार आरोपीला बेड्या
Assault due to old dispute in Jalgaon : Pasar accused in chains जळगाव : शहरातील सम्राट कॉलनीत तरुणावर जुन्या वादातून हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पसार तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ललित उमाकांत दीक्षीत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ललित दीक्षीतसह त्याच्या साथीदारांनी जुन्या वादातून शुभम भगवान माळी या सम्राट कॉलनीतील तरुणावर 28 जुलै रोजी प्राणघातक हल्ला केला होता.
गोपनीय माहितीवरून कारवाई
दीदक्षीत वाडीतील ललित दीक्षीत हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्याला पोलिस पथकाने पाळधी येथील हॉटेल मातोश्री येथून शिताफीने अटक केली. संशयिताला न्या.सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस हवालदार किरण पाटील, सचिन पाटील, इमरान सय्यद, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, योगेश बारी, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी आदींनी केली. अटकेतील ललित याच्याविरुद्ध यापूर्वी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
