जळगावातील कुविख्यात गुन्हेगार डबल भेजासह दोघे हद्दपार


Notorious criminal from Jalgaon Double Beja along with two deported जळगाव : तब्बल 15 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (22, रा.गेंदालाल मिल, जळगाव) व आमीर उर्फ गुडन शेख महमद (20, रा.गेंदालाल मिल, जळगाव) यांना जळगाव पोलिस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टोळीची जळगावात दहशत
दोन्ही गुन्हेगार हे टोळीने राहून जळगाव शहरासह जिल्ह्यात दहशत पसरव होते व नागरीकांच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण झाला होता. जळगाव जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था ठेवण्याबाबत त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नसल्याने जळगाव शहरचे निरीक्षक अनिल भवानी, याशीर तडवी, हवालदार विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, अमोल ठाकुर, प्रफुल धांडे यांनी तयार केल्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप गावीत यांनी छाननी केली. गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह अंमलदार एएसआय युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनील दामोदरे यांनी प्रस्तावाचे कामकाज पाहिल्यानंतर तो पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे पाठवण्यात आल्यानंतर अधीक्षकांनी दोघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !