भुसावळात बायोडिझेलच्या संशयावरून गुन्हे शाखेने टँकर पकडला


The crime branch seized the tanker on suspicion of biodiesel in Bhusawal भुसावळ : अवैधरीत्या बायोडिझेलची वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने फेकरी टोल नाक्याजवळ रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुजरातमधील टँकर जप्त केला आहे. या टँकरमध्ये बायोडिझेलसदृश ज्वलनशील पदार्थ असून पुरवठा विभागाच्या अहवालाअंतीच त्यात बायोडिझेल आहे वा नाही, हे सांगता येईल, असे गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांना टँकरद्वारे बायोडिझेलची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. जळगाव गुन्हे शाखेचे रणजीत जाधव, प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, अनिल महाजन आदींच्या पथकाने फेकरी टोल नाक्याजवळ टँकर (जी.जे.12 बी.एक्स.0479) आल्यानंतर त्यास ताब्यात घेतल्यानंतर चालकाकडे कागदपत्रांची विचारणा केली असला चालक समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही त्यामुळे वाहन तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले.



पुरवठा विभागाला याबाबत सूचित केल्यानंतर पुरवठा विभागाने वाहनातील ज्वलनशील पदार्थाचे नमूने तपासणीला रवाना केले आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील म्हणाले की, बायोडिझेल वाहतुकीच्या संशयातून टँकर ताब्यात घेतला आहे. हा टँकर गुजराथहून अकोलाकडे चालक महेंद्र कुमार यादव (40, उत्तरप्रदेश, रायबरेली) हा घेवून जात होता. पुरवठा विभागाच्या नमून्यांचा अहवाल आल्यानंतर वाहनात बायोडिझेल आहे वा नाही हे स्पष्ट झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवली जाईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !